टॅंकरची महावितरण कंपनीच्या पोलला धडक ; चालकाविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- निवळी येथील वॉटर च्या ठिकाणी निष्काळजीपणे ट्रॅकर चालवून महावितरण कंपनीच्या वीज वाहिनीचा पोलाचे नुकसान करुन पलायन करणाऱ्या टॅन्कर चालकाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (ता. २८) रात्री अकराच्या सुमारास घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित हा ट्रॅंकर (क्र. एनएल-०१ के ४३६८) घेऊन निवळी ते जयगड जाणाऱ्या रस्त्यावर निवळी वाटरपार्क येथे टॅकर निष्काळजीपणे चालवून महावितरणचे निवळी-पाली ३३ केव्ही वीज वाहिनीचा पोल नं ५२, याला धडक दिली. त्यामध्ये लोखंडी पोल वाकवून नुकसान केले. तसेच या अपघाताची खबर न देता पलायन केले. या प्रकरणी धनाजी कृष्णराव कळेकर (रा. सध्या-पाली, रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात टॅंकर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस अमंलदार करत आहेत.