मारुती मंदिर येथे दुचाकीला धडक देत टेम्पो चालक फरार

रत्नागिरी:- शहरातील मारुती मंदिर येथे दुचाकी घेऊन झेंडूची फुले आणण्यासाठी गेलेल्या महिलेला टेम्पोने धडक दिली. या अपघातात महिला जखमी झाली. मात्र टेम्पो चालकाने पलायन केले. शहर पोलिस ठाण्यात अज्ञात टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (ता. २४) सायंकाळी साडेपाच ते पावणे सहाच्या सुमारास लोटलीकर हॉस्पिटलच्या समोरिल रस्त्यावर डिवायडर जवळ घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी निलेश शांताराम काळे (वय ५३, रा. आयटीआय रोड, शिवाजीनगर, रत्नागिरी) यांची पत्नी सौ. निशी निलेश काळे (वय ४७) या दसऱ्यासाठी झेंडूची फुले आणण्यासाठी दुचाकी घेऊन शिवाजीनगर ते मारुती मंदिर अशा येत असताना लोटलीकर हॉस्पिटल समोरिल डिवायडर जवळ मागून येणाऱ्या अज्ञात टेम्पो चालकाने धडक दिली व पलायन केले. या अपघातात. सौ. काळे या गाडीसह पडल्या त्यांच्या डाव्या पायाला दुखापत होऊन ढोपराजवळ फॅक्चर झाले. या प्रकरणी निलेश काळे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.