संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानासाठी मार्गदर्शक सूचना जारी

रत्नागिरी:- सन 2022-23 व त्यापुढील कालावधीत संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्याबाबत निर्धारीत केलेले आहे. त्या निकषानुसार सन 2023-24 या वर्षातील स्पर्धा घेण्याबाबत शासन स्तरावरुन मार्गदर्शन सुचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. नागरीकांचे स्वच्छतेबाबतीत होणारे मतपरिवर्तन व गावांगावामधून सुरु असलेल्या स्वच्छतेच्या चळवळीत ग्रामीण भागातील सर्व नागरीक व ग्रामस्थांचा सक्रीय व सातत्यपूर्ण सहभाग घेतला जाणार आहे.

ग्रामीण स्वच्छता कार्यक्रमाचा मूळ उद्देश ग्रामीण जनतेच्या आरोग्यमानाचा दर्जा उंचावण्याचा आहे. स्वच्छतेच्या सवयी अंगीकारुन, ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्यमान, जीवनस्तर उंचावण्यासाठी शासनाकडून राबविण्यात येणाऱया अभियान / कार्यक्रमामध्ये निर्माण होणाऱया स्वच्छतेसंबंधी गावांमध्ये तयार होणाऱया स्वच्छतेच्या नव्या सुविधा, नागरीकांचे स्वच्छतेबाबतीत होणारे मतपरिवर्तन महत्वाचे आहे. त्यांच्या वेगवेगळया ग्रामपंचायती, तालुके व जिल्हयात स्वच्छतेच्या विविध पैलूतील प्रगतीबाबत एक सर्वसमावेशक स्पर्धा राबवून व त्या माध्यमातून ग्रामस्थांना प्रोत्साहीत केले जाणार आहे.
या कार्यक्रमाचे आपलेपणा व महत्त्व पटवून देण्याकरीता सन 2000-2001 पासून संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. सन 2022-23 व त्यापुढील कालावधीत संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्याबाबत निर्धारीत केलेल्या निकषानुसार सन 2023 24 या वर्षातील स्पर्धा घेण्याबाबत शासन स्तरावरुन मार्गदर्शन सुचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. त्याअनुषंगाने सन 2023 – 24 या वर्षातील स्पर्धा 7 ऑक्टोबर 2022 रोजीच्या शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या विहीत वेळेत पार पाडाव्यात असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजार यांनी केले.
त्यानुसार शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या कालावधीचा तपशिल पुढील प्रमाणे आहे. ग्रामपंचायत स्तर समिती गठन व कृती कार्यक्रम निश्चिती दि.19 ऑक्टोबर ते दि.15 नोव्हेंबर 2023, जिल्हा परिषद गट स्तर स्पर्धा व तपासणी दि.21 नोव्हेंबर ते दि.21 डिसेंबर 2023, जिल्हा परिषद गट स्तर प्राथमिक तपासणी , दि.21 नोव्हेंबर ते दि.5 डिसेंबर 2023, जिल्हा परिषद गट अंतिम तपासणी दि.6 डिसेंबर ते दि.21 डिसेंबर 2023, जिल्हास्तर तपासणी दि.22 डिसेंबर 2023 ते दि.06 जानेवारी 2024, विभागीयसतर तपासणी दि.7 जानेवारी ते दि.30 जानेवारी 2024 असा आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धात्मक पारितोषिक
जिल्हास्तर  जिल्हा परिषद गट  प्रथम पारितोषिक 60 हजार रु., जिल्हास्तर पथम 36 लाख, द्वितीय 4 लाख तर तृतीय 3 लाख रु., विभागस्तर पथम 12 लाख रु., द्वितीय 9 लाख, तर तृतीय 7 लाख रु., राज्यस्तरावर पथम 50 लाख रु., द्वितीय 35 लाख रु, तर तृतीय 30 लाख रु. अशी आहे. त्याचपमाणे स्व.वसंतराव नाईक पुरस्कार – घनकचरा, सांडपाणी व मैलागाळ व्यवस्थापन जिल्हास्तर 50,000/-, विभाग स्तर 75,000/- , राज्य स्तर 3 लक्ष रु., डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार – पाणी गुणवत्ता व पाणी व्यवस्थापन जिल्हास्तर 50,000/- , विभाग स्तर 75,000/- , राज्य स्तर 3 लक्ष, स्व.आबासाहेब खेडकर पुरस्कार – शौचालय व्यवस्थापन जिल्हास्तर 50,000/-, विभाग स्तर 75,000/-, राज्य स्तर 3 लक्ष रु. आहे.