पोक्सो अंतर्गत शिक्षा झालेल्या प्रौढाची आत्महत्या

दापोली:- पोक्सो अंतर्गत शिक्षा ठोठावलेल्या आंजर्ले – ताडाचा कोंड (ता. दापोली) येथील ५० वर्षीय प्रौढाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. प्रवीण प्रताप भोसले असे त्याचे नाव असून, ही घटना शनिवारी सायंकाळी ६:३० वाजता घडली.

प्रवीण भोसले याला खंड सेशन कोर्टाने पोक्सो अंतर्गत १८ महिने कारावास व ५ हजार रुपयांचा दंड तसेच दंड न भरल्यास ३ महिन्यांची शिक्षा ठोठावण्यात आली होती. शिक्षा ठोठावल्याच्या दिवसापासून तो तणावात होता. या तणावातच त्याने घराच्या पोटमाळ्यावर वाशाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

कोरोना काळात तालुक्यातील गव्हे येथे पीडित मुलगी मैत्रिणींसोबत सायकल चालवत होती. त्यावेळी प्रवीण भोसले याने त्या मुलीला काही अश्लील व्हिडीओ दाखवल्याची फिर्याद दाखल करण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात ११ ऑक्टोबर रोजी त्याला पोक्सो अंतर्गत शिक्षा सुनावण्यात आली होती. या शिक्षेच्या तणावाखालीच त्याने आत्महत्या केल्याची नोंद दापोली पोलिस स्थानकात करण्यात आली आहे. याबाबत दापोली पोलिस स्थानकात रविवार, २२ ऑक्टोबर रोजी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात थाली आहे.