रानडुकराच्या हल्ल्यात बाप-लेक जखमी

संगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यातील कुळे वाशी येथे आज सकाळी सहा वाजता रानडुकराने हल्ला केल्याने मुलगी आणि वडील जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, नेहमी प्रमाणे सकाळी सुहास गंगाराम गुरव (55) हे आपल्या मुलगी संपदा सुहास गुरव (16) ही बुरबी हायस्कुलला जात असल्याने तिला एस टी, मधे बसविण्यासाठी एस टी थांब्यावर उभे होते.

तेवढ्यात अचानक एक मोठा रानटी डुकर आला आणि त्याने सुहास गुरव याच्या वर हल्ला केला, त्यावेळी डुकराचा सुळा सुहास गुरव यांच्या उजव्या हाताच्या दंडात घुसला, वडिलांवर हल्ला झाल्याचे पाहुन संपदा गुरव हिने आरोडा ओरडा केला असता डुकराने आपला मोर्चा तिच्या कडे वळवला. तिला ही धडक देऊन तिला खाली पाडले. त्यामध्ये तिला किरकोळ मुका मार लागला आहे.

यावेळी सुहास गुरव याने त्या डुकराला हुसकावन्याचा प्रयत्न केला त्यात त्यांना अणेक ठिकाणी किरकोळ जखमा झाल्या तर छातीला किरकोळ जखम होऊन मुका मार बसला आहे. गुरव याने डुकराला प्रतिकार केल्याने डुकराने पुन्हा हल्ला करण्यासाठी पवित्रा घेतला तेवढ्यात एस, टी, आल्याने डुकराने जंगलात पळ काढला. निव्वळ एस.टी.मुळे सुहास यांचा प्राण वाचल्याचे बोलले जात आहे.

गाडीतील प्रवाशांनी जखमी सुहास आणि संपदा हिला बुरंबी येथे आणुन बुरंबी इथून राजेश साबळे, सरपंच चांदे यांचे पती आदिनी दोघांना तात्काळ संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, ग्रामीण रुग्णालयात दोघांवर प्राथमिक उपचार करुन करुन सुहास गुरव यांच्या उजव्या हाताच्या दंडाला सहा टाके घालण्यात आले आहेत.

डुकराने केलेल्या हल्ल्यात दोघे जखमी झाल्याची खबर वनविभागाला मिळताच वनविभागाचे गार्ड आर. डी. पाटील तात्काळ संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले, त्यांनी जखमिंची विचारपूस करुन वनखात्याच्या वरीष्ठाना अहवाल दिला आहे.