दापोली:- नवरात्रोत्सवानिमित्त लागू केलेल्या मनाई आदेशाचे उल्लंघन करत जमावाने ग्रामस्थांचा रस्ता अडविल्याचा प्रकार मुरुज भयरीचा कोंड ( ता . दापोली ) येथे शनिवारी सकाळी ८:३० वाजता घडला . यावेळी जमावाने एकाला मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी १८ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबत कमलाकर भीमसेन घडसे यांनी फिर्याद दिली आहे . त्यानुसार मुरुड ( ता . दापोली ) येथे राहणारे किशोर शिगवण , संतोष जाधव , मकरंद गुरव , चंद्रकांत मांजरेकर , राजेश शिगवण , अभय गुरव , अमित मोरे , किरण यादव , अनिल घडसे , प्रकाश अडविलकर , अनंत अडविलकर , गणेश घडसे , सुभाष घडसे , दिलीप घडसे , सचिन मांजरेकर , जयसिंग गुरव , राजेंद्र लाड व कातळकर ( पूर्ण नाव माहीत नाही ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे . कमलाकर घडसे यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर अठरा जणांनी जमाव जमवून वाट अडविली होती . याबाबत कमलाकर घडसे यांनी विचारणा केली असता त्यांना मारहाण केली . त्यांच्या पत्नीच्या हाताला धरून लोटले.