कडेकोट पोलीस बंदोबस्तात मिरकरवाडा बंदरावरील अतिक्रमण हटवण्यास सुरुवात

रत्नागिरी:- रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदरावरील अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या बांधकामावर मंगळवारी सकाळी कारवाई हाती घेण्यात आली आहे. बंदरावर एकूण ३०३ झोपड्या, शेड आणि पक्की बांधकामे आहेत. या अनधिकृत बांधकामावर मत्स्य विकास प्राधिकरणाने मंगळवारी सकाळपासून कारवाईला सुरुवात केली आहे.

ही कारवाई करताना कडेकोट पोलीस बंदोबस्त देखील मागवण्यात आला आहे. सोबत नगरपालिका अतिक्रमण विभागाला देखील मदतीला घेण्यात आली आहे. कारवाई सुरु होताच काही मच्छिमारांनी या कारवाईला विरोध केला तर काहींनी स्वतःहून आपली अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली आहे.