पेट्रोल टँकर अपघात प्रकरणी चालकाविरोधात गुन्हा दाखल

रत्नागिरी:- बेदरकारपणे पेट्रोल टँकर चालवून अपघात केल्याप्रकरणी चालकाविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अपघाताची ही घटना बुधवार 11 ऑक्टोबर रोजी स.10 वा.नाणीज ईरमलवाडी येथे घडली होती.

वैभव कृष्णाजी कुलकर्णी (43,रा.कासगाव वाळवा,सांगली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या टँकर चालकाचे नाव आहे.बुधवारी तो आपल्या ताब्यातील टँकर (एमएच-08-जी-1388) घेउन मिरज ते गणपतीपुळे असा भारत पेट्रोलियम डेपो मिरज येथून पेट्रोल व डिझेल टाकीमध्ये भरुन कोल्हापूर ते पाली या रस्त्याने येत होता.तो ईरमलवाडी फाटा नाणीज या ठिकाणी आला असता त्याचा टँकरवरील ताबा सूटला.त्यामुळे टँकर रस्त्याच्या विरुध्द उजव्या बाजुला उलटून हा अपघात झाला होता.याप्रकरणी त्याच्या विरोधात भादंवि कायदा कलम 179,337 मोटार वाहन कायदा कलम 184 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.