दापोली:- दापोलीतील साई रिसॉर्ट बांधकाम प्रकरणात व्यावसायिक सदानंद कदम यांना सत्र न्यायालयाने मोठा दणका दिला. सत्र न्यायाधीश एम. जी देशपांडे यांनी सुनावणी पूर्ण झाल्यानंतर सुमारे तीन महिने राखून ठेवलेला निर्णय मंगळवारी देताना जामीन अर्ज फेटाळून लावला.
साई रिसॉर्ट बांधकामाशी संबंधित कथित आर्थिक अफरातफर प्रकरणात सदानंद कदम आणि जयराम देशपांडे हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. ईडीने आरोपपत्र दाखल केल्यानंतर सदानंद कदम यांनी अॅड. सचिन हांडे यांच्यामार्फत, तर जयराम देशपांडे यांनी अॅड. सुबीर सरकार यांच्यामार्फत जामिनासाठी दाद मागितली आहे. त्यांच्या अर्जावर सुनावणी पूर्ण झाल्यानंतर विशेष पीएमएलए न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांनी २६ जून रोजी निर्णय राखून ठेवला होता. तो आज जाहीर करताना जामीन अर्ज फेटाळून लावला.