प्राथमिक शिक्षकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा

रत्नागिरी:- जुनी पेन्शन लागू करा’,’शाळांचे खाजगीकरण थांबवा’,’२० पटा खालील शाळा सुरुच ठेवा’,’आमच्या मागण्या मान्य करा,नाहीतर खुर्च्यां खाली करा’ अशा घोषणा देत प्रथमिक शिक्षकांच्या सर्व संघटनांनी एकत्र येत सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला.या मोर्च्यात जिल्हाभरातील हजारो शिक्षक सहभागी झाले होते.

शासकिय विश्रामगृह येथून भव्य मोर्चाला सुरुवात झाली. महिला, पुरुष शिक्षक या मोर्चात सहभागी झाले होते. तर महिलांची संख्या खूप मोठी होती.हातात घोषणांचे फलक घेवून गुरुजी घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. यावेळी जिल्हा प्रशासना शिक्षकांच्यावतीने निवेदन देण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने या मागण्याचा समावेश होता.
शिक्षक व सर्व कर्मचारी यांना तात्काळ जुनी पेन्शन योजना लागू करणे, दत्तक शाळा योजना तात्काU रद्द करणे, कंत्राटीकरणाचा शासन आदेश रद्द करणे, कमी पटाच्या शाळा एकत्रिकरण करण्याचा शासन आदेश रद्द करणे, शिक्षकांकडील सर्व अशैक्षणिक कामे तात्काळ रद्द करणे, ऑनलाइन माहितीचा भडीमार तात्काळ थांबविणे, शिक्षकांना पूर्ण वेळ शाळेत थांबून शिकवायला देणे, शिक्षण विभागाला आवश्यक ते अनुदान तात्काळ देणे, शिक्षकांची मुख्यालयाची अट रद्द करा, एमएससीआयटीची अट रद्द करा, दिव्यांग कर्मचार्यांच्या सहाय्यक उपकरणांसाठी आवश्यक अनुदान मंजूर करा, सर्व प्रकारची पदोन्नती तात्काU पूर्ण करा, शिक्षकांकडील पोषण आहारची जबाबदारी अन्य यंत्रणे कडे देणे, बीएलओचे काम कायमचे शिक्षकांकडून काढून घ्या या मागण्याचा समावेश होता.

या मागण्यांची तात्काळ दखल घेवून योग्य निर्णय घ्यावा, अन्यथा या पुढे शिक्षक आक्रमक आंदोलन करतील, गुरुजी जर पेटून उठला तर सरकारलाही घरी पाठवायला कमी करणार नाही असा इशारा राज्य संपर्क प्रमुख विकास नलावडे यांनी दिला. यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष कदम, सरचिटणीस संदीप जालगांवकर, कार्याध्यक्ष कैलास शार्दुल, कोषाध्यक्ष चंद्रकांत कोकरे, संतोष रावणंग यांच्यासह शिक्षक मोर्चा सहभागी झाले होते.