सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन; दोघांविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- तालुक्यातील मालगुंड येथील उंडीचा पऱ्या आणि गायवाडी बीच येथील सार्वजनिक ठिकाणी परवाना नसताना मद्य प्राशन करणाऱ्या दोघांविरुद्ध जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निकेत अनंत डोर्लेकर, अक्षय अशोक डोर्लेकर अशी संशयितांची नावे आहेत. या घटना मंगळवारी (ता. 26) साडेसातच्या सुमारास निदर्शनास आल्या.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित सार्वजनिक ठिकाणी परवाना नसताना मद्य प्राशन करत असताना आढळले. या प्रकरणी कुणाल चव्हाण आणि निलेश गुरव यांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास जयगड पोलिस अमंलदार करत आहेत.