पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी न.प.चे युध्दपातळीवर प्रयत्न

शनिवारी पाणी सुरु करण्यासाठी अधिकारी-कर्मचारी घेत आहेत 24 तास मेहनत

रत्नागिरी:- ऐन गणेशोत्सवात शीळ येथील जॅकवेल कोसळल्यानंतर नगर पालिकेने नवीन जलवाहिनीची ठेकेदार कंपनी अन्वी कन्स्ट्रक्शनच्या मदतीने पंपहाऊस सुरळीत करण्यासाठी चौवीस काम सुरु ठेवले आहे. त्यामुळे शुक्रवार-शनिवारपयर्र्त पाणी पुरवठा पूर्ववत करण्यासाठी नगर पालिकेचे अधिकारी मेहनत घेत आहेत. कोसळलेल्या जॅकवेलमध्ये अडकलेले पंप व इलेक्ट्रीक सामान धोकादायक परिस्थितून सुरक्षित बाहेर काढण्यातही ठेकेदाराला यश आले आहे.

रत्नागिरी नळपाणी योजनेच्या लांबलेल्या कामकाजावर टिका केली जात असताना, निविदेपेक्षा 60 टक्के जादा कामे करावी लागल्याने योजनेच्या कामांना वेळ लागला. शीळ धरण ते शीळ पंपहाऊस, पंप हाऊस ते कोस्टगार्ड व कोस्टगार्ड ते साळवीस्टॉप अशी तीन टप्प्यापैकी दोन टप्प्यात पाईप लाईनची लांबी निविदेपेक्षा अधिक वाढली. जीवनप्राधिकरणच्या चुकीच्या सर्वेमुळेच हा प्रकार घडला. त्यामुळे वाढीव लाईनबाबतही जीवनप्राधिकरणने सुमारे दीड वर्षांनी लाईन मोजून पत्र व्यवहार केल्याने ही पाईप लाईनच्या कामाला वेळ लागला.

जॅकवेल कोसळल्यानंतर शहरातील पाणी पुरवठा ठप्प झाला. नव्या पंपहाऊसच्या कामाला वेग आला आहे. दोन नवीन पंपही या ठिकाणी बसवण्यात आले. इलेक्ट्रीकचे कामे वेगाने सुरु आहे. नवीन पाईप लाईन पंपहाऊसला जोडण्याचे काम सुरु असून, शुक्रवार ते शनिवारपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी नगर पालिका कर्मचारी व अन्वी कन्स्ट्रक्शनचे कर्मचारी प्रयत्न करीत आहेत. नदीच्या दिशेने कोसळलेल्या जॅकवेलमधील अडकलेले साहित्यही अन्वी कन्स्ट्रक्शनच्या कर्मचार्‍यांनी जीव धोक्यात घालून बाहेर काढले. इलेक्ट्रीक स्विचेस, अन्य मशनरी, पंप बाहेर काढण्यात आले.


जीवन प्राधिकरणाच्या चुकीच्या सर्वेचा फटका नवीन नळपाणी योजनेला बसला आहे. शीळ धरण ते साळवीस्टॉप जलशुध्दीकरण केंद्रापयर्र्त वाढलेली पाईप लाईन असो की पानवल धरण ते गोडावून स्टॉप जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत वाढलेल्या पाईप लाईनच्या वाढलेल्या कामाचे पत्रव्यवहार करण्यासच उशिर केल्याने पाईपलाईन मोजण्यासही उशिर झाल्याने कामाचा वेळ वाढल्याची चर्चा पाणी विभागात सुरु आहे.