रूम बुकिंगच्या नावाखाली ९० हजारांची फसवणूक

खेड:- हॉटेल मॅनेजर बोलत आहे, मी आपली रूम बुकिंग करून देतो, अशी खोटी बतावणी करत खेडमधील संतोषकुमार हरिभाऊ खंदाडे यांना तब्बल ९० हजार ६२८ रुपयांची एका अज्ञाताने ऑनलाईन फसवणूक केली. हा प्रकार ११ सप्टेंबरला सई बाल रुग्णालयात घडला. या प्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संतोषकुमार हरिभाऊ खंदाडे हे लोणावळा येथील एका रिसॉर्टमधील रुम बुक करण्यासाठी हॉटेलच्या वेबसाईटवरील फोन नंबरवर फोन करून रुम बुक करत होते. त्यावेळी अज्ञताना मी रिसॉर्टचा मॅनेजर बोलत आहे, असे सांगितले. त्याने व्हॉटस अॅपवर पाठविलेल्या खात्यावर दोन वेळा २४ हजार रुपये पाठवले. तसेच त्यांच्या खात्यातून १९ हजार ७७ आणि २३ हजार ५५१ रुपयांची खरेदी करून ऑनलाईन फसवणूक केली. या प्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.