दोन दिवसांनी जिल्ह्यात पाऊस पुन्हा सक्रिय होण्याचा अंदाज

रत्नागिरी:- एल निनो’चा प्रभाव कमी होऊन येत्या दोन दिवसांत कोकणात पावसाचे प्रमाण काहीअंशी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. रविवारी आणि सोमवारी रत्नागिरी जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी ंनी हजेरी लावली होती. त्यामुळे खऱीपातील अडचणीच्या काळात पाऊस झालेल्या भागातील भातपिकांना दिलासा मिळाला आहे.

कोकणाबरोबरच सरव्च भागाताली पाऊस एल निनाच्या प्रभाने अनियमित झाला आहे. याचा प्रभाव गेल्या काही दिवसांपासून जाणवत आहे. त्यामुळे जिल्ह्यात ऑगस्टमध्ये मोजकेच दोन तीन दिवस पावसाच्या सरी कोसळल्या. पावसाअभावी जिल्ह्यात भात पिकांची वाढ खुंटली आहे. शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. एकीकडे पावसाने दडी मारलेली असताना, दुसरीकडे कडक ऊन पडल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे रत्निागिरी जिल्ह्यातील सर्वच पिके अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रविवारी सायंकाळी रत्नागिरी तालुक्याच्या काही भागात पावसाच्या हलक्या सरी झाल्या. सोमवारी सकाळीदेखील पावसाचे मळभी वातावरण होते. काही भागात हलक्या सरीही झाल्या. त्यामुळे या भागातील भात पिकांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील काही भागातदेखील हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. पाऊस झालेल्या भागातील भात पिकांना तूर्तास जीवदान मिळाले आहे. दरम्यान, ‘एल निनो’च्या प्रभावामुळे पाऊस पडत नसल्याचे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे; मात्र आगाम काळात ’एल निनो’चा प्रभाव काहीसा कमी होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे पुढील एक-दोन दिवसांत कोकणात पावसाचे प्रमाण काही अंशी वाढेल, असा अंदाज हवामान विभागाचा आहे. मात्र येत्या दोन-तीन दिवसांत चांगला पाऊस झाला नाही, तर जिल्ह्यात भात शेती अडचणीत येण्याची शक्यता आहे.