जिल्हा परिषदेच्या आदर्श शिक्षक पुरस्काराची घोषणा

रत्नागिरी:- जिल्हा परिषदेच्यावतीने दिल्या जाणार्‍या प्राथमिक शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजार यांनी पत्रकार परिषदेद्वारे जाहीर करण्यात आले. जिल्ह्यातील 9 प्राथमिक शिक्षकांचा त्यामध्ये समावेश आहे.

या शिक्षक पुरस्कारासाठी 30 शिक्षकांच्या मुलाखती व परीक्षा जि.प.प्रशासनस्तरावर घेण्यात आली होती. हा अहवाल आता कोकण आयुक्त कार्यालयात पाठवण्यात आला होता. त्या अहवालावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर जि.प.सीईओ किर्तीकिरण पुजार यांनी हे पुरस्कार सोमवारी सायंकाळी जाहीर केले आहेत. त्यामध्ये सुनील सिताराम आईनकर (जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा शेनाळे, मंडणगड), जयंत जनार्दन सुर्वे (प्राथमिक शाळा, पाजपंढरी, दापोली), सुधाकर राजाराम पाष्टे (जि.प.शाळा ऐनवरे, खेड), पांडुरंग शांताराम कदम (जि.प.पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा मालघर नं.1, चिपळूण), दशरथ रघुनाथ साळवी (जि.प.शाळा काजुर्ली नं. 1, गुहागर), उमेश पांडुरंग डावरे (जि.प.आदर्श केंद्रशाळा साखरपा नं.1, संगमेश्वर), विशाखा विष्णू पवार (कुवारबाव उत्कर्षनगर प्राथमिक शाळा, रत्नागिरी), संजना संतोष वारंग (जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा माजळ, लांजा), सुभाष भाउ चोपडे (जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा करक नं.1, राजापूर) यांचा समावेश आहे.

दरवर्षी शिक्षकदिनी 5 सप्टेंबरला हा कार्यक्रम घेतला जातो. यावर्षीही शिक्षण विभागाकडून कार्यक्रमाची तयारी सुरू होती. पण या पुरस्कारांच्या वितरणाचा कार्यकम लवकरच जाहीर केला जाईल असे सीईओ किर्तीकिरण पुजार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
जिह्यातील 9 तालुक्यातून प्रत्येकी एका शिक्षकाला आदर्श पुरस्कार देण्यात येतो. तसेच एका शिक्षकाला विशेष पुरस्कार दिला जातो. अशा एकूण 10 जणांना पुरस्काराचे वितरण केले जाते. पण यावर्षी पाप्त झालेल्या प्रस्तावांमध्ये विशेष पुरस्कारासाठी कोणताही शिक्षक पात्र ठरला नसल्याचे सीईओ किर्ती किरण पुजार यांनी यावेळी सांगितले.