निवळी कोकजे वठार येथे टेम्पो दुचाकीची धडक; दोघेजण गंभीर जखमी

रत्नागिरी:- मुंबई गोवा महामार्गावरील निवळी घाटातील कोकजेवठार येथे टेम्पो व दुचाकीमध्ये समोरासमोर धडक झाली. हा अपघात रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास झाला. या अपघातात दुचाकी चालकासह मागे बसलेल्या महिलेला गंभीर दुखापत झाली.

रत्नागिरीतून टेम्पो चालक निलेश दत्तात्रेय पोद्दार (वय 28 वर्ष, राहणार कोल्हापूर) हा संगमेश्वरच्या दिशेने जात होता. टेम्पो (क्रमांक MH-09 -FL- 9139) कोकजेवठार येथे आला असता टेम्पो विरुद्ध बाजूला जाऊन समोरून येणाऱ्या दुचाकीला (क्रमांक MH-44 -A- 3809) जोरदार धडक दिली. देवरुखातून दुचाकी चालक अशोक घुले (वय वर्ष 23 रा.जे के फाईल रत्नागिरी) आणि मागे बसलेल्या राधिका चौरे (वय वर्ष 45 रा. जे के फाईल रत्नागिरी) रत्नागिरीच्या दिशेने येत होतें. टेम्पो चालकाने विरुद्ध दिशेला जाऊन दुचाकीला धडक दिल्यानंतर पाच ते सहा फूट दुचाकी फरफटत न्हेली. या अपघातात दुचाकी चालकाच्या डोक्याला जोराचा मार लागला तसेच मागें बसलेल्या महिलेला देखील छाती व डोक्याला गंभीर दुखापत झाली.