दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या जिल्ह्यात 713 शाळा

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हापरिषद शाळेतील पटसंख्या दिवसेंदिवस घटत आहे. यातच जिल्ह्यात 1 ते 10 विद्यार्थी पटसंख्या असलेल्या शाळांची संख्या तब्बल 713 वर पोहचली आहे. खेडमध्ये सर्वाधिक 115 शाळांची पटसंख्या दहापेक्षा कमी आहे. घटती पटसंख्या शाळांसाठी चिंतेची बाब ठरत आहे.

दहा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये चिपळूणात 89 शाळा, दापोलीत 87 शाळा, गुहागर मध्ये 45 शाळा, खेड 115 शाळा, मंडणगड 62 शाळा, लांजा 49 शाळा, राजापूर 111 शाळा, रत्नागिरीत 51 शाळा आणि संगमेश्वर मध्ये 104 शाळेत दहा पेक्षा कमी पटसंख्या आहे. 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांची संख्या 679 आहे. वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये चिपळूणात 82 शाळा, दापोलीत 76 शाळा, गुहागर मध्ये 53 शाळा, खेड 95 शाळा, मंडणगड 40 शाळा, लांजा 69 शाळा, राजापूर 97 शाळा, रत्नागिरीत 79 शाळा आणि संगमेश्वर मध्ये 94 शाळेत वीस पेक्षा कमी पटसंख्या आहे.

खासगी शाळांमध्ये पाल्यांना पाठविण्याचा पालकांचा कल वाढला आहे.खासगी किंवा इंटरनॅशनल स्कूलकडे पालकांचा ओढा जास्त आहे. भरमसाठ फी असली तरी पालक आपल्या मुलांना खासगी शाळेत पाठवत आहेत. जिल्ह्यात शंभर पटसंख्या असलेल्या जिल्हापरिषद शाळांची संख्या 77 आहे. 20 ते 99 पटसंख्या असलेल्या शाळांची संख्या 995 आहे