वैश्य युवा तर्फे मानाच्या ‘राधाकृष्ण श्री २०२३’ जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन

रत्नागिरी:- रत्नागिरीतील अत्यंत प्रतिष्ठेची समजली जाणारी वैश्य युवा अयोजित ‘राधाकृष्ण श्री २०२३’ ही जिल्हास्तरीय स्पर्धा रविवार दिनांक २७ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे. राधाकृष्ण मंदिर, बाजारपेठ रत्नागिरी येथे ही स्पर्धा होणार असून ही स्पर्धा २७ ऑगस्टला सायंकाळी 6 वाजता सुरू होणार आहे.

ही स्पर्धा चार गटात घेण्यात येणार आहेत. किताब विजेत्याला रोख रक्कम 11000/- व आकर्षक शिल्ड देऊन गौरव करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक गटात 5 क्रमांक निवडण्यात येणार आहेत. प्रत्येक गटातील पहिल्या विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे 2000/-, 1500/-, 1000/-, 500/- अशी रोख पारितोषिक व आकर्षक शिल्ड देण्यात येणार आहे. याशिवाय बेस्ट पोझर, व उगवता तारा यांचीही निवड करण्यात येणार आहे. त्यांना रोख रुपये 1000/- व आकर्षक शिल्ड देण्यात येणार आहे.

सर्व स्पर्धकांना रात्रीचे जेवण आयोजकांमार्फत देण्यात येणार आहे. रत्नागिरी तालुक्याबाहेरील स्पर्धकांना एकवेळच्या बसचा प्रवासखर्च दिला जाईल. ही स्पर्धा रत्नागिरी जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटनेच्या मान्यतेने घेण्यात येणार आहे. या स्पर्धेचे आयोजन वैश्य युवा ही संघटना करत आहे. अधिक माहितीसाठी सदानंद जोशी 8668306148, शैलेश जाधव तसेच वैश्य युवाचे विरेंद्र वणजू 9960977333, फैयाज खतिब, सौरभ मलुष्टे, मनोहर दळी, सचिन केसरकर, मुकुल मलुष्टे, सुनिल बेंडखळे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. इच्छुक सर्व स्पर्धकांनी आपली नावे वेळेत देणे बंधनकारक आहे. २७ ऑगस्टला सायंकाळी 5.00 वाजता स्पर्धेच्या ठिकाणी हजर राहायचे अनिवार्य असणार आहे.