भारताची चंद्र मोहिम फत्ते; दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत पहिला देश

बंगळुरू:- भारताची चंद्रावर स्वारी करण्याची मोहिम अखेर फत्ते झाली. चांद्रयान ३ ने इतिहास रचला असून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे.

यासोबतच भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. भारतासह जगातील प्रत्येकाच्या नजरा या ऐतिहासिक घटनेकडे लागल्या होत्या. जसजसा लँडिंगचा क्षण जवळ येत होता, तसतशी धाकधूक वाढत गेली, श्वास रोखले गेले, हात जोडले गेले आणि डोळे मिटले गेले आणि आनंदाची बातमी आली. भारताचं चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्यात यशस्वी ठरलं आहे. चंद्राचा दक्षिण ध्रुव कायम अंधारात असतो.

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान- ३ ची यशस्वी लँडिंग झाली आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सतत सावली असते. या भागात सूर्य किरण पोहोतच नाहीत. या भागात Moon Ice आणि पाणी मिळण्याची शक्यता सांगितली जातेय. या भागात १३ किलोमीटर पर्यंत चंद्रावरचे खड्डे आहेत. चंद्रावर अनेक प्रकारचे धुमकेतू आदळून हे खड्डे तयार होता. या खड्ड्यांमुळे आकाशगंगेचा इतिहास शोधण्यास मदत होणार आहे.