कोकणकन्या एक्स्प्रेसमधून सोन्याचे दागिने लंपास

चिपळूण:- कोकणकन्या एक्स्प्रेसमधून प्रवास करीत असताना एका प्रवाशाची सॅक चोरीस गेली . त्यामध्ये ७० हजार रुपये किमतीचे दागिने अज्ञाताने चोरून नेले आहेत . या प्रकरणी चिपळूण पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दि . ८ जून रोजी पहाटेच्यावेळी घडली. फिर्यादी मानसी मिनेश पाटील ( रा . कल्याण रोड , डोंबिवली , मूळ रा . राधानगरी , कोल्हापूर ) यांनी मुंबई ते कणकवली असा प्रवास करीत असताना कोकणन्या एक्सप्रेसमध्ये जनरल डब्यात आपली सॅक व पर्स सिटच्या खाली ठेवली होती . त्या झोपल्या असताना अज्ञाताने ही सॅक चोरून नेली . या सॅकमधील डब्यात ठेवलेले ३८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र , सोन्याची कर्णफुले , सोन्याची अंगठी असे ७० हजारांचे दागिने चोरट्याने लांबविले.