जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता यांना कारणे दाखवा नोटीस

रत्नागिरी:- भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या राष्ट्रीय कार्यक्रमाला गैरहजर राहणार्‍या जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता सुहास गायकवाड यांना जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पाटबंधारे संकुलात विविध विभागातील अधिकारी उपस्थित राहून ध्वजवंदन करीत असतात. 15 ऑगस्ट रोजी पाटबंधारे येथील मुख्यालयातील कार्यक्रमाला जलसंधारणचे कार्यकारी अभियंता सुहास गायकवाड हे गैरहजर राहिले होते. याची गंभीर दखल जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी घेतली आहे.

झेेंडावंदनसारख्या राष्ट्रीय समारंभाला असलेली अनुपस्थिती ही गंभीर गोष्ट असून यासाठी महाराष्ट्र नागरी सेवा 1979च्या तरतुदीनुसार शिस्तभंगाची कारवाई का प्रस्तावित करण्यात येऊ नये याबाबत नोटीस मिळाल्यावर 24 तासाच्या आत खुलासा करावा अशी नोटीस बजावण्यात आली आहे.
याबाबत खुलासा न केल्यास आपल्याला काही सांगायचे नाही असे समजून कारवाईसाठी वरिष्ठ कार्यालयात प्रस्ताव पाठवण्यात येईल असे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी म्हटले आहे.