रत्नागिरीसह संगमेश्वरातील पोलीस पाटील आरक्षण जाहीर

रत्नागिरी:- रत्नागिरी व संगमेश्वर तालुक्यातील रिक्त असलेल्या पोलीस पाटील पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरु झाली असून आरक्षण सोडत काढण्यात आली. दोन्ही तालुक्यात मिळून 169 गावांमध्ये ही भरती केली जाणार असून यात 30 टक्के आरक्षण महिलांसाठी काढण्यात आले आहे.

दोन्ही तालुक्यात मिळून 169 जागांपैकी 25 जागांवर अनुसूचित जातीसाठी आरक्षण काढण्यात आले असून यात 11 जागा महिलांसाठी राखीव आहेत. अनुसुचित जाती महिला राखीवमध्ये रत्नागिरी तालुक्यात कपिलवस्तू, साखरमोहल्ला-जयगड, तरवळ, लाजूळ, पानवल, आंबेशेत तर संगमेश्वरमध्ये मासरंग, उमरे, फणसट, चांदिवणे, मेघी,जांभुळवाडी, डावखोल या गावांचा समावेश आहे तर अनुसूचित जातीमध्ये रत्नागिरीत मराठवाडी सैतवडे, कासारी, साठरे यांचा तर संगमेश्वरमध्ये भिमनगर, बोरसूत, ताम्हाणे, मेढे त. फुणगुस, तुळसणी, तिवरे तर्फे देवळे, राजिवली, चोरवणे, कर्ली या गावांचा समावेश आहे.
अनुसूचित जमातीसाठी काढण्यात आलेल्या आरक्षणमध्ये महिला आरक्षणात रत्नागिरीत काळबादेवी मयेकरवाडी, सैतवडे, कळझोंडी, धामणसे, संगमेश्वरमध्ये नावडी, धामापूर तर्फे देवरुख, आंबेडखुर्द या गावांचा समावेश आहे. तर अनुसुचित जमातीसाठी रत्नागिरीत सडामिर्‍या, कुवारबाव, कुरतडे, जमातवाडी-जांभारी यांचा तर संगमेश्वरमध्ये कोंडअसुर्डे, निवळी, कोंडभुजबळराव, मुरादपूर, धामणी, वांद्री, ओझरखोल, वाशी त. संगमेश्वर, शिवधामापूर, कोळंबे, कांटे, निवेखुर्द, कोंडिवरे, शिरंबे, वाशी त. देवरुख या गावांचा समावेश आहे.
वि.जा.(अ)साठी महिला आरक्षणात संगमेश्वरमध्ये रांगव, कोसुंब, करजुवे, माखजन तर वि.जा.(अ)मध्ये रत्नागिरीत ओरी तर संगमेश्वरमध्ये आरवली, घाटिवळे खुर्द, कानलकोंड, साखळकोंड, असुर्डे, तामजाळे या गावांचा समावेश आहे.

वि.जा.(ब)साठी संगमेश्वरमध्ये वांझोळे खुर्द तर महिलांसाठीच्या आरक्षणात रत्नागिरी चांदोर व कोठारवाडी -चरवेली या गावांचा समावेश आहे.
वि.जा.(क)मध्ये महिलांसाठी रत्नागिरीत वळके तर संगमेश्वरात पाचांबे या गावांसाठी समावेश असून वि.जा. (क)साठी रत्नागिरी तालुक्यात मुसलमानवाडी-गोळप, मावळंगे, तरवळ-माचिवलेवाडी, चिंद्रवली, दखिण, किरबेट, मळदेवाडी तर संगमेश्वरमध्ये कुळये, विकासनगर-कडवई या गावांचा समावेश आहे.
वि.जा.(ड)मध्ये गणपतीपुळे-मालगुंड, नवा सोमेश्वर, साखरतर-काळबादेवी, कर्ला-मुसलमानवाडी, डांगेवाडी-हातखंबा तर संगमेश्वरमध्ये कडवई या गावांचा समावेश असून महिला आरक्षणात रत्नागिरी भोळेवाडी-काळबादेवी, खालगावड ही गावे आहेत.
विमाप्र साठी काढण्यात आलेल्या आरक्षणात महिलांसाठी रत्नागिरीत खारवीवाडी-जांभारी, मुस्लीमवाडी-गावखडी तर विमाप्र साठी ठिकाणी सोमण-पूर्णगड, नाचणे-म्यु.बाहेर, मुसलमानवाडी-कोतवडे, खालचीवाडी वेतोशी, काळबादेवी, झाडगाव म्यु. बाहेर या गावांचा समावेश आहे.

इतर मागास प्रवर्गासाठी काढण्यात आलेल्या आरक्षणात महिलांसाठी रत्नागिरी कचरे, उंडी, नातुंडे, चिखलवाडी-देऊड, भंडारवाडी-गावखडी, कंभारवाडा-करबुडे, उंबरवाडी-कोतवडे तर संगमेश्वरमध्ये कोंडभैरव, कातुर्डीकोंड, रातांबी या गावांचा समावेश असून इतर मागास प्रवर्गासाठी सत्कोंडी, म्हामूरवाडी, बागपाटोळे, कुणबीवाडी नांदिवडे या गावांचा समावेश आहे.

खुला गटामध्ये महिला आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक अशी दोन आरक्षणे काढण्यात आली आहेत. यामध्ये महिलांसाठी काढण्यात आलेल्या आरक्षणात रत्नागिरी तालुक्यात ठिकाण चक्रदेव, आडी-शिरगाव, दाभिळ आंबेरे, मजगाव, सरफरेवाडी-खानू, मिरजोळे, रहाटगर-मालगुंड, नेवरे काजिरभाटी, कोंड-फणसवळे, धनावडेवाडी,मायंगडेवाडी तरवळ, भंडारवाडा वरवडे, वेळवंड तर संगमेश्वरमध्ये आंबवली मुसलमानवाडी, वाडिआदिष्टी, किरडूवे, बुरंबाड, आगरेवाडी तुळसणी, घोडवली या गावांचा समावेश आहे. खुला गटात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकामध्ये रत्नागिरीत शिरगाव-मुसलमानवाडी, वैद्यलागवण, जाकिमिर्‍या, पेठपूर्णगड, वाडाजून, पिरंदवणे, निवळी, ठिकाण बेहेरे-पूर्णगड, आंबेकरवाडी-निवळी, डोर्ले, वाडामिर्‍या-मिर्‍या, मधलीवाडी वेतोशी, वरवडे तर संगमेश्वरमध्ये कुरधुंडा खुर्द, बेलारीवाडी, जंगलवाडी, निनावे या गावांचा समावेश आहे. खुला गटात रत्नागिरीत शिरगाव तिवंदेवाडी, शिवारआंबेरे, मराठवाडी मालगुंड, तारवेवाडी-हातखंबा, भगवतीनगर निवेंडी, घवाळीवाडी पानवल, नांदिवडे, वायंगणी, भोके, भंडारवाडी मालगुंड, करबुडे, सड्ये तर संगमेश्वर मध्ये आंबेट, किंजळे पुनर्वसन, सोनगिरी आंबेड बु., कोंडउमरे, कसबा संगमेश्वर, देवळे घेरा प्रचितगड, शिंदे आंबेरी, फुणगूस, तळे, पूर्ये त. सावर्डा, करंडेवाडी, साखरपा खुर्द, नवालेवाडी या गावांचा समावेश आहे.
प्रांताधिकारी जीवन देसाई यांच्या अध्यक्षतेखाली उपविभागीय पोलीस अधिकारी विनित चौधरी, उपविभागीय पोलीस अधिकारी गृह निलेश माईणकर, तहसीलदार म्हात्रे यांच्या उपस्थितीत आरक्षण काढण्यात आले.