तुळसणी येथे कार- दुचाकीचा भीषण अपघात; दोघेजण गंभीर जखमी

संगमेश्वर:- तालुक्यातील देवरूख तुळसणी येथे कार आणि दुचाकीमध्ये गुरुवार १० ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊच्या भीषण अपघात झाला. या अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

एका फायनान्स कंपनीचे दोन ऑफिसर दुचाकीवरून (दु. क्रमांक MH 08 AZ 2060) रत्नागिरी ते देवरूख असा प्रवास करत होते. तुळसणी दरम्यान दुचाकी आली असता समोरून येणाऱ्या कार (गाडी क्रमांक MH 08 AX 4073) चालकाने कृष्णा लक्ष्मण जाधव (वय 54, राहणार राजापुर) याने दुचाकीला जोरदार धडक दिली. दुचाकीला दिलेली धडक इतकी जोराची होती की, दोघेही रस्त्यावर फेकले गेले. एका ऑफिसरचा पाय गुडघ्यातून पूर्ण फिरून मोडला आहे. दुसऱ्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. दोघेही गंभीर स्थितीत असल्याने दोघांनाही वाहनचालकांच्या मदतीने तत्काळ रत्नागिरीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ऋतिक रवींद्र पवार (वय ३०, राहणार सोमेश्वर, रत्नागिरी) व कल्पेश विलास कांबळे (वय २८, राहणार – निवसर, रत्नागिरी) अशी अपघातातील गंभीर जखमींची नावे आहेत.