कागदपत्र कमी असलेला अर्ज स्वीकारा मात्र पूर्तता करून घ्या: ना. सामंत

रत्नागिरी:- विविध दाखल्याच्या अर्जाला  एखादे कागदपत्र  कमी  असेल तर  तो  अर्ज संबंधित अधिकाऱयांच्या आदेशामुळे रत्नागिरीतील सेतूतील कर्मचारी स्वीकारत नव्हते. पण राज्याच्या अधिवेशनात व्यस्त असलेले पालकमंत्री उदय सामंत यांनी या बाबीची तात्काळ दखल घेत संबंधीत अधिकाऱयांना सेतू मध्ये एखादा पुरावा कमी असेल तर अर्ज स्वीकारा आणि त्याच वेळी त्या पुरावयाची पूर्तता करण्यासाठी संबंधीत अर्जदाराला सूचना कराव्यात असे आदेश  दिले आहेत.  

सेतू  कार्यालय रत्नागिरीमधून  वेगवेगळ्या दाखल्याचे अर्ज स्वीकारले जातात.  मात्र  त्या   दाखल्याच्या  अर्जाला  एखादे  कागदपत्र  कमी  असेल तर  तो  अर्ज संबंधित  अधिकाऱयांच्या आदेशामुळे सेतूतील कर्मचारी  स्वीकारला जात नव्हता. या  शासकीय  कार्यालयातील आदेशामुळे  सेतू कर्मचारी आणि  अर्जदारमध्ये  वाद  निर्माण होत होते. ही  बाब मजगांव  सरपंच, शिवसेना विभाग  संघटक फैयाज मुकादम यांनी महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय  सामंत आणि सिंधुरत्न समिती चे सदस्य किरण  सामंत यांच्या निदर्शनात आणून  दिली.  राज्याचे  अधिवेशनात व्यस्त असलेले मंत्री उदय  सामंत  यांनी या बाबीची तात्काळ दखल  घेतली आहे. संबंधीत  अधिकाऱयांना सेतूमध्ये एखादा  पुरावा  कमी असेल तर अर्ज स्वीकारा आणि त्याचवेळी त्या पुरावयाची पूर्तता करण्यासाठी संबंधीत अर्जदाराला सूचना कराव्यात, असे आदेश  दिलेत. या आदेशामुळे आता  अपूर्ण अर्ज स्वीकारल्यामुळे अर्जाच्या पावतीमुळे शासकीय  शिक्षण  प्रवेश  घेणे  सुलभ  होणार  असल्याचे मजगांव  सरपंच फैयाज  मुकादम यांनी माहिती दिली.