मिरजोळे येथे विहीर खचल्याने घराला धोका

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरानजिकच्या मिरजोळे नाखरेकरवाडी येथे सार्वजनिक विहीर अतिवृष्टीमुळे खचल्याने लगत राहणाऱया विजय नाखरेकर यांचा घराला धोका निर्माण झाला आहे. या घटनेची दखल घेत विहीर तातडीने भराव टाकून बुजविण्याची घेण्यात आलेली कारवाई थांबल्याने तहसिलदार पशासनाने यामध्ये तातडीने दखल घ्यावी अशी मागणी या नाखरेकर कुटुंबियांनी केली आहे.

नाखरेकरवाडी येथे गेल्या 23 जुलै रोजी पडीक सार्वजनिक विहीर खचण्याची ही घटना घडली होती. त्या घटनेची तहसिलदार राजाराम म्हात्रे तसेच पोलीस यंत्रणेचे अधिकारी, तलाठी, ग्रामपंचायत मिरजोळेचे सरपंच, सदस्य यांनी देखील पाहणी केली होती. विजय नाखरेकर यांच्या लगत असणाऱया घराला असलेला धोका लक्षात घेत तहसिलदारस्तरावरून खचलेली विहीर तात्काळ बुजविण्याचे निर्देश देण्यात आलेले होते. त्यानुसार विहीरीत मातीचा भराव टाकून बुजविण्याचे काम सुरू झालेले होते. पण हे काम 25 जुलैपासून तेथील शेजाऱयांच्या वादानंतर थांबवण्यात आलेले आहे. त्याबाबत नाखरेकर यांनी 112 नंबरला तकारही दिलेली आहे. ग्रामपंचायत स्तरावरून हे थांबलेले काम सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आलेले होते. पण आठवडा उलटूनही त्यावर कार्यवाही न झाल्याने विजय नाखरेकर यांच्या घराला निर्माण झालेला धोका कायम राहिला आहे. आगामी काळात घराचे नुकसान झाल्यास संबधित यंत्रणा व या कामाला विरोध करणारे जबाबदार राहतील असा आक्षेप नाखरेकर कुटुंबियांनी केली आहे.