शिवाजीनगर वेश्या व्यवसाय प्रकरणात आणखी सहाजणांना बेड्या

आतापर्यंत दहा जणांना अटक; एका महिलेचाही समावेश

रत्नागिरी:- शहरातील शिवाजीनगर येथील वेश्या व्यवसाय प्रकणातील मुख्य संशयित आरोपी राजेंद्र चव्हाण याच्या अन्य 6 साथिदारांना शहर पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली आहे. या वेश्या व्यवसाय प्रकरणात अटक करण्यात आलेल्या एकूण संशयितांची संख्या आता 10 झाली असून यात एका महिलेचा समावेश आहे.

अरबाज असलम चाउस (रा.सारखरतर, रत्नागिरी), नविद अश्रफ कनवाडकर (उद्यमनगर, रत्नागिरी), सलवा सादिक नावडे (रा.मिरकरवाडा, रत्नागिरी) या तिघांना रविवारी न्यायालयाने 1 दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. तर साई प्रसाद साळुंखे (रा.कोकणनगर,  रत्नागिरी), रोहन मंगेश कोळेकर (शिवाजीनगर, रत्नागिरी) आणि प्रविण प्रकाश परब (रा.गवळीवाडा,  रत्नागिरी) या तिघांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली.

यापूर्वी अब्दुल मतीन हसनमियाँ डोंगरकर (36, रा.बोर्डिंग रोड माळनाका, रत्नागिरी), ओमकार जगदीश बोरकर (चिंचखरी, रत्नागिरी) आणि समिर मंगेश लिंबुकर (23, मुळ रा.देवरुख सध्या रा.आरोग्य मंदिर, रत्नागिरी) या तिघांना शहर पोलिसांनी अटक केली होती. पोलिस कोठडीनंतर आता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली असून शहर पोलिस या गुन्ह्याची पाळेमुळे खोदून काढत असून या गुन्ह्यातील अन्य 6 जणांना अटक केली आहे.