निवळी येथे महामार्गावर दरड कोसळून वाहतूक ठप्प

रत्नागिरी:- जिल्ह्याला मागील तीन दिवसापासून मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. सतत कोसळणाऱ्या पावसाने अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडत आहेत. गुरुवारी सकाळी रत्नागिरी तालुक्यातील निवळी घाटात मोठी दरड रस्त्यावर कोसळल्याने महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी बाबू म्हाप यांनी स्वतःची यंत्रणा कामाला लावत दरड बाजूला हटवली. अवघ्या तासात वाहतूक पूर्ववत झाली.

जिल्ह्यात बुधवारपासून कोसळणाऱ्या पावसाचा जोर कायम आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. दरम्यान, रत्नागिरी – हातखंबा मार्गावरील निवळी घाटात आज सकाळी दरड कोसळून रस्त्यावर आली आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. दरडीमुळे दोन्ही बाजूला वाहने थांबवून ठेवण्यात आली आहेत. सुदैवाने यावेळी कोणतेही वाहन न आल्याने दुर्घटना टळली.