नाट्यगृहाच्या अपग्रेडेशनसाठी 10 कोटी रुपये: ना. सामंत

रत्नागिरी:- स्वा. सावरकर नाट्यगृहाचा अपग्रेडेशनसह रत्नागिरी शहरातील विविध कामांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 30 कोटीचा निधी दिला असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.

येथील स्वा. सावरकर नाट्यगृहाचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. येथील व्यवस्थेविषयी प्रसिध्द कलाकारांनीही नाराजी व्यक्त केली होती. प्रेक्षकांच्याही तक्रारी वाढत आहेत, या पार्श्वभूमीवर नाट्यगृहाच्या अपगे्रडेशनसाठी आता 10 कोटीचा निधी मिळाला आहे. यातून नाट्यगृहातील सर्व समस्या मार्गी लागतील असे ना. सामंत यांनी सांगितले. त्याचप्रमाणे रत्नागिरी शहराच्या खालील भागासाठी एक स्विमिंग पूल व्हावे अशी नागरिकांची मागणी होती. त्यासाठीही 10 कोटीचा निधी उपलब्ध दिला आहे. बा. ना. सावंत भाजी मार्केटसाठी पाच कोटी तर गार्डनसाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.