रत्नागिरी शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या पाच जणांवर गुन्हा

रत्नागिरी:- शहरातील वेगवेगळ्या सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करण्यासाठी बसलेले होते. अशा पाच जणांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रविवार, ९ जुलै रोजी करण्यात आली.

यामध्ये सय्यद मलिक शेख, सुरेंद्र काळुराम भाटी, नरपत पुनमसिंग रावत, प्रमोद सोहनसिंग रावत, परमहंस शारदा शर्मा (सर्व रा. रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पाच संशयितांची नावे आहेत. रविवारी दिवसभर शहर पोलिस गस्त घालत होते. साळवी स्टॉप, प्रमोद महाजन संकुल शेजारील गारवा बीअर शॉपी बाहेर उघड्या जागेत, मिरजोळे पडवेवाडी ताम्हणकर चिकन सेंटरच्या मागे अशा वेगवेगळ्या ठिकाणी हे संशयित आपल्या पुढे दारूची बाटली घेऊन बसलेले आढळून आले होते. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.