रोटरी क्लब रत्नागिरीच्या अध्यक्षपदी श्रीकांत भुर्के यांची निवड

रत्नागिरी:- २ जुलै रोजी रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी चा २०२३-२४ साठी पदग्रहण सोहळा संगम हॉल येथे मोठया थाटात आणि उत्साहात पार पडला. नूतन अध्यक्ष म्हणून श्री श्रीकांत भुर्के, सचिव श्री प्रमोद कुलकर्णी , खजिनदार श्री प्रकल्प आराध्ये आणि सर्व बोर्ड डायरेक्टर यांनी या पदग्रहण सोहळ्यात पदभार स्वीकारला.

कार्यक्रमाला मुंबईतून रोटरी डिस्ट्रिक्ट ३१४१ , २०१९-२० चे माजी गव्हर्नर श्री हरजीत सिंग तलवार हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते त्यांच्या हस्ते नवीन अध्यक्षांनी पदभार स्वीकारला . त्याच बरोबर मान्यवरांमध्ये रोटरी ३१७० डिस्ट्रिक्ट चे असिस्टंट गव्हर्नर डॉ केतन चौधरी हे देखील उपस्तिथ होते , तसेच २०२२-२३ चे अध्यक्ष श्री राजेंद्र घाग आणि सचिव श्री रुपेश पेडणेकर यांनी त्यांच्या केलेल्या कामाचा आढावा प्रस्तुत केला . विशेष प्रोजेक्ट मध्ये सिविल हॉस्पिटलला रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी तर्फे दिल्या जाणाऱ्या NICU कामाचे सर्वानी कौतुक केले. या NICU प्रोजेक्ट साठी आर्थिक मदत जास्तीत जास्त उभी करणाऱ्या रोटरी सदस्य श्री निलेश मुळे , श्री सचिन शिंदे , सौ नीता शिंदे , श्री दिलीप भाटकर , सौ दीप्ती भाटकर यांचा सत्कार करण्यात आला . नूतन अध्यक्षांनी येणाऱ्या वर्षात आयोजित केलेल्या कामाची माहिती दिली आणि रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी तर्फे समाज उपयोगी विविध कामे करू अशी ग्वाही दिली . विशेष कामगिरी करणाऱ्या रत्नागिरी मधील व्यक्ती श्री विशाल भावे , श्री प्रमोद कोनकर , श्री अक्षय फाटक आणि सौ स्वप्नजा मोहिते यांचा देखील रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी तर्फे सत्कार करण्यात आला . विविध परीक्षा तसेच स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळालेल्या मुलांचा देखील सत्कार करण्यात आला यात कु ओम काळोखे , कु अथर्व भागवत , कु आरोही भागवत , , कु सौम्या मुकादम , कु आर्यन वेल्हाळ हे सामील आहेत. कार्यक्रमामध्ये ४ नवीन रोटरी मेंबर्स देखील दाखल झाले यात त्यांना प्रमुख पाहुण्यांनी रोटरी पिन देऊन सन्मानित केले.
जेष्ठ रोटरी सदस्य ज्यांनी स्वतःच्या कामात विशेष पुरस्कार मिळवले ते श्री केशव इंदुलकर आणि श्री मुकेश गुप्ता याना देखील सन्मानित करण्यात आले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला रोटरी सदस्य – सौ माधुरी कळंबटे , सौ वेदा मुकादम , सौ नीता शिंदे आणि सौ ऋता पंडित यांनी पार पाडले .या कार्यक्रमासाठी सर्व रोटरी सदस्यांनी खूप परिश्रम घेतले. कार्यक्रमाला सर्व रोटरी सदस्य आणि परिवार, रोटरी क्लब ऑफ मिडटाउन चे सदस्य तसेच रत्नागिरी मधील प्रतिष्ठित नागरिक उपस्तिथ होते.