साखरपा:- संगमेश्वर तालुक्यातील साखरपा देवरुख मार्गावरील कोंडगाव तिठ्यापासून एक किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या कडेला असलेले मोठे जांभळाचे झाड रस्त्याच्या मधोमध कोसळले. या ुळे दोन्ही बाजूकडील वाहतूक ठप्प होऊन वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
याची कल्पना कोंडगाव येथील स्थानिक ग्रामस्थांना लागताच प्रशासनाच्या यंत्रणेची वाट न पाहता तुषार गांधी यांनी कटर मशीन आणून झाड तोडण्यास सुरुवात केली. यावेळी राजन किर, बापू शेट्ये, सामाजिक कार्यकर्ते राजन देसाई व अन्य सहकारी तरुणांच्या सहाय्याने झाड कापून बाजूला करण्यात आले व काही वेळातच वाहतूक सुरळीत करण्यात आली. यावेळी कोंडगाव साखरपा येथील तरुणांचे उपस्थित वाहनधारक व परिसरातील जनतेने कौतुक केले.