पोलिस उपविभागीय अधिकारी पदाचा कार्यभार विनीत चौधरी यांनी स्वीकारला

रत्नागिरी:- रत्नागिरी (शहर) उपविभागीय पोलीस अधिकारी पदाचा कार्यभार श्री. विनित चौधरी यांनी गुरूवारी स्वीकारला आहे. रत्नागिरी शहर पोलीस निरीक्षक पदावरून बढतीने श्री.चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात दोन वेळा पोलीस निरीक्षक पदाचा कार्यभार उत्तमरित्या सांभाळणाऱ्या श्री.विनित चौधरी यांना नुकतीच गृहखात्याने बढती दिली होती. पोलीस निरीक्षक पदाच्या कालावधीत रत्नागिरी जिल्ह्यात उत्तमरित्या काम करून अनेक गंभीर गुन्हे उघड करून गुन्हेगारांना गजाआड केले होते. परजिल्ह्यासह परराज्यातील चोरट्यांच्या टोळ्या पकडून त्यांच्याकडील मुद्देमाल हस्तगत करण्यात श्री.चौधरी यांना यश आले होते.

रत्नागिरी जिल्ह्यातील त्यांच्या कामकाजाची दखल घेऊन गृहविभागाने बढतीने त्यांची नियुक्ती रत्नागिरी (शहर) उपविभागीय पोलीस अधिकारी पदावर केली आहे. त्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या रत्नागिरी शहर, रत्नागिरी ग्रामीण, जयगड, पूर्णगड, संगमेश्वर ही पोलीस स्थानके श्री.चौधरी यांच्या अखत्यारीत येणार आहेत. नव्याने उपविभागीय पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर श्री.चौधरी आपल्या उपविभागात कोणत्या नवनवीन योजना राबवितात याकडे अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.