पर्यटन वाढीसाठी दर्जेदार रस्ते असणे आवश्यक: ना. लोढा

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटन वाढीसाठी मोठा वाव आहे. याठिकाणी पंचतारांकित हॉटेल्सच्या माध्यमातून बाहेरील पर्यटक वाढीसाठी प्रयत्न सुरू आहेत. स्थानिकांना पर्यटनच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करून कशी देता येईल यासंदर्भात आढावा बैठक घेेण्यात आली. पर्यटन वाढीसाठी रस्ते चांगले असणे महत्त्वाचे आहे. महामार्गाचे काम पूर्ण झाल्यावर पर्यटक याठिकाणी वळतील असे ना. मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.

ना. मंगलप्रभात लोढा हे मागील सात दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रात वीर सावरकर विचार जागरण सप्ताह निमित्ताने फिरत आहेत, रविवारी रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आले असताना त्यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी त्यांच्यासोबत भाजप नेते दीपक पटवर्धन आणि उमेश कुलकर्णी हेदेखील उपस्थित होते.

ज्या पतित पावन मंदीरात 13 वर्षे सावरकरांचे
वास्तव्य होते त्याठिकाणी काही करता येईल का याचाही विचार झालेल्या आढावा बैठकीत करण्यात आल्याचे मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले. कोकणात पर्यटन वाढीसाठी खूप काही करण्यासारखे आहे आधी रस्ते नीट झाले पाहिजे तरच पर्यटक याठिकाणी सुरक्षित येऊ शकतो रस्त्यांची उणीव याठिकाणी जाणवली, पर्यटन वाढीसाठी नाविन्यपूर्ण काय करता येईल यासाठी एक शासकीय समिती स्थापन करण्यात येईल यामध्ये स्थानिकांचा प्रतिनिधी म्हणून सहभाग असेल असेही ते बोलले.

याठिकाणी आल्यावर पर्यटक राहिला पाहिजे त्यासाठी कोणत्या गोष्टींची सुधारणे करणे आवश्यक आहे, आणखीन चांगल्या सुविधा कशा निर्माण करता येतील याची नोंद करून याविषयी पाठपुरावा करण्यात येईल, असेही ते बोलले. एमटीडीसी मध्ये रिक्त पदे आहेत, ते लवकरात लवकर भरण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.