सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल

रत्नागिरी:- सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करण्यासाठी बसलेल्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई सोमवार 22 मे रोजी मुरुगवाडा येथील देशी बारच्या बाहेर वाळूवर करण्यात आली.

अब्दुल हमीद अली बड्डू (मुळ रा.मुरडेश्वर कर्नाटक सध्या रा.मिरकरवाडा,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.सोमवारी शहर पोलिसांना अब्दुल हा मुरुगवाडा पांढरा समुद्रासमोरील देशीबारच्या बाहेर समोर दारुची बाटली ठेवून पिण्यासाठी बसलेला असताना ही कारवाई करण्यात आली.त्याच्याविरेाधात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कायदा कलम 84 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.