मिरकरवाडा येथे अखंडित वीज पुरवठ्यासाठी नवी डीपी; सोहेल साखरकर यांच्या पाठपुराव्याला यश

रत्नागिरी:- शहरातील मिरकरवाडा येथे मागील काही दिवसांपासून मध्यरात्री लाईट जाण्याच्या समस्येने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. येथील नागरिकांनी ही बाब माजी नगरसेवक सोहेल साखरकर यांच्या निदर्शनास आणून दिली. साखरकर यांनी तत्काळ महावितरणच्या कार्यालयात धडक दिली. येथील महावितरणचे अधिकारी श्री. वासावे यांच्या सहकार्याने मिरकरवाडा येथे नवी डीपी मंजूर करून घेत तातडीने या डीपीचे काम तातडीने सुरू करण्यात आले आहे.

शहरातील मिरकरवाडा येथील वरचा मोहल्ला येथे मागील काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी वारंवार विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले होते. वाढत्या गरमीत येथील नागरिकांना प्रचंड त्रास सुरू झाला. रात्रीच्या वेळी वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने येथील नागरिकांनी ही बाब माजी नगरसेवक सोहेल साखरकर यांच्या निदर्शनास आणून दिली. सोहेल साखरकर यांनी तत्काळ माजी नगरसेवक नुरा पटेल आणि येथील नागरिकांसह महावितरणचे अधिकारी श्री. वासवे यांची भेट घेत मिरकरवाडा येथील समस्येबाबत विचारणा केली. महावितरणचे अधिकारी वसावे यांनी मिरकरवाडा येथील समस्येवर तत्काळ उपाययोजना आखली.

विजेची मागणी वाढल्याने या भागात रात्रीच्या सुमारास वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार सुरू झाले होते. यावर तात्पुरती उपाययोजना म्हणून विजेच्या मागणीत विभागणी करताना मिरकरवाडा येथे वरचा मोहल्ला येथे नवी डीपी मंजूर करून बुधवारी या डिपी बसवण्याच्या कामाला तत्काळ शुभारंभ करण्यात आला. नवी डीपी कार्यान्वित होताच या भगातील वीज पुरवठा आखंडित सुरू राहील असे महावितरणचे अधिकारी श्री. वसावे यांनी सांगितले.