रिफायनरीसाठी जागेचे दर जाहीर करा, दूध का दूध पानी का पानी होऊन जाईल: प्रमोद जठार

रत्नागिरी:- रिफायनरी प्रकल्पासंदर्भात कोकणवासीयांच्या भावनांशी सुरू असेला खेळ सर्वांनी थांबवावा. आम्ही लाचार नाही, तर स्वाभिमानी आहोत. शासनाने चार दिवसात जमिनीचे दर जाहिर करा म्हणजे दूध का दूध, पानी का पानी होऊन जाईल. जमीन दिली तर प्रकल्प होईल, नाहीतर दुसररीकडे जाईल. पण नालीसाठी घोडा घालवू नका. एकदाचा हा खेळ खंडोबा थांबवा, अशा भाषेत भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी सर्व पक्षियांना
सुनावले. उद्धव ठाकरे यांनी कोकणावरचे पुतना मावशीचे प्रेम दाखवू नये. मुख्यमंत्री असताना तुम्हीच बारसूतील जागेबाबत केंद्राला पत्र दिले. आता पत्रच दिल्याचा इनकार करून ठाकरे पत्रच गिळण्याचा प्रयत्न केला, असा टोलाही श्री. जठार यांनी लगावला.

शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. श्री. जठार म्हणाले, कोकणाचा उरला सुरला सर्व बेरोजकारीचा बॅकलॉक भरून काढणारा हा रिफायनरी प्रकल्प आहे. लाखाहुन जास्त हातांना रोजगार मिळणार आहे. महाराष्ट्राचा नव्हे तर देशाचा जीडीपी वाढविणारा प्रकल्प आहे. सावकारी नाही तर सरकारी हा प्रकल्प आहे. परंतु आज या प्रकल्पावरून नुसता खेळ खंडोबा सुरू आहे. पुर्वी ज्यांनी विरोध केला ती मंडळी आता समर्थक झाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेसने, राज ठाकरे यांनी या प्रकल्पाला समर्थन दिले आहे. भाजपने हा प्रकल्प आणला परंतु ज्यांचा विरोध होता त्यांनी तो रद्द केला. सरकारमध्ये असलेल्या एकनाथ शिंदेंना ते गद्दार म्हणतात. परंतु गद्दारी ठाकरेंनी केली. युती म्हणून लढलात आणि पदासाठी महाविकास आघाडी करून मुख्यमंत्री झाला. मुख्यमंत्री पद मिळाल्यानंतर स्वतः तुम्ही केंद्राला पत्र देऊन बारसू येथील जागा उपलब्द असल्याचे लिहिले आहे. जेव्हा पद गेले, सरकार गेले तेव्हा जी भाषा खोक्यांची होती ती खोकी मिळणे दुरापास्त झाले म्हणून विरोधात उतरला.

ठाकरेंना विनंती आहे, तुम्ही ६ तारखेला बारसूत आला तर एक, दोन दिवस नव्हे तर महिनाभर रहा. तुमचा आम्ही पाहुणचार करतो. परंतु तेथील गरीब कुटुंबांची परिस्थिती जवळून पहा. नोकऱ्यांसाठी आज कुटुंबंच्या कुटुंब स्थलांतरीत झाली आहेत. वृद्ध आई-वडीलच घरांमध्ये आहे. अशा ही गरीब दुर करायची असले तर प्रत्येक कुटुंबातील एकाला तरी या प्रकल्पाच्या माध्यमातून रोजगार मिळेल. चांगल्या पायाभूत सुविधा, आरोग्य सुविधा, उच्च शिक्षण आदी व्यवस्था निर्माण होईल. परंतु तुम्हाला ते काय समजणार तुम्ही कोरोनाच्या काळात कोकणी माणसाला सिमेवर आडवून परत पाठवत होता. परंतु आता पुत्ना मावशीचे प्रेम कोकणी माणसाला दाखवू नका. तुम्ही केंद्राला दिलेले पत्र तुम्ही स्वतःतरी वाचले आहे का. बाळासाहेब ठाकरे जेव्हा शब्द देत होते. तेव्हा ते कधी शब्द गिळत नव्हते. परंतु उद्धव ठाकरे यांनी देशाला अचंबित केले. पत्र देऊनही आपण पत्रच दिले नसल्याचा कांगावा करीत आहेत. मात्र प्रकल्पाबाबत शरद पवार यांचे कौतुक केले पाहिजे. त्यांनी वस्तूस्थिती समजून घेण्यासाठी उद्योग मंत्र्यांना बोलावून घेतले. स्थानिकांना प्रकल्प समजावून सांगण्यास सांगितले.