संगमेश्वर:- करजुवे खाडीत वृद्धाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. करजुवे भोईवाडी येथील तुकाराम बाळू पारधी असे बुडून मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे.
तुकाराम बाळू पारधी हे 30 एप्रिल रोजी संध्याकाळी करजुवे खाडीत गेले होते. भरतीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडून गेले होते. त्यांचा 1 मे रोजी शोध घेतला असता सकाळी 11 वाजता खाडीच्या पाण्याच्या पात्रात मृतदेह सापडला. याबाबत संगमेश्वर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस शिंदे करत आहेत.