जिल्ह्यातील 9 अंमलदारांना महासंचालक पदक जाहीर

रत्नागिरी:- राज्य पोलिस दलात उल्लेखनीय आणि प्रशंसनीय कामगिरी करणाऱ्या राज्यातील पोलिस अधिकारी आणि अंमलदारांना 2022 मधील पोलिस महासंचालक पदक जाहीर झाले आहे. पदकांच्या 800 जणांच्या यादीमध्ये रत्नागिरी पोलिस दलातील 9 जणांचा समावेश आहे. यामध्ये रत्नागिरीतील सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक भगवान पाटील, नितिन पंदेरे, प्रकाश सुतार, प्रदिप गमरे, चंद्रकांत कांबळे यांच्यासह 9 जणांचा समावेश आहे. पोलिस महासंचालक पदक जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे.

गुन्ह्यांची उकल करण्यामध्ये रत्नागिरी पोलिसांचा उल्लेख केला जातो. अनेक थरारक गुन्ह्यांची उकल करताना व दोषींविरोधात ठोस पुरावा जमा करताना गुन्ह्यांचा तपास लावला आहे. विशेषत: कोरोना काळात कर्तव्य चोख बजावत संवेदनशील अशा परिसरातही प्रशंसनीय कामगिरी केली आहे. या कामाची दखल घेण्यात आली असून, राज्य पोलिस दलातील सर्वोच्च असे मानल्या जाणाऱ्या पोलिस महासंचालक पदकांनी कर्तव्यनिष्ठ पोलिसांचा सन्मान करण्यात येणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक भगवान पाटील ( रत्नागिरी), नितिन पंदेरे (रत्नागिरी),प्रदिप गमरे (सावर्डे), प्रकाश सुतार (रत्नागिरी), चंद्रकांंत कांबळे (संगमेश्वर), पोलीस हवालदार गिरिष सार्दल, बाळू पालकर, उमेश गायकवाड, योगेश तेंडूलकर (रत्नागिरी) यांचा समावेश आहे. दि.1 मे रोजी शासकीय ध्वजारोहण सोहळ्यात त्यांना पोलीस पदक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. पोलिस महासंचालक पदक जाहीर झ्ााल्याबद्दल सर्व अंमलदारांचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी अभिनंदन केले आहे.