संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात गटस्तरावर
बसणी ग्रामपंचायत प्रथम क्रमांकाने सन्मानित

रत्नागिरी:- नुकत्याच गौरवण्यात आलेल्या संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात बसणी ग्रामपंचायतीला शिरगाव गट अंतर्गत प्रथम क्रमांक प्राप्त झाला. कृषिमंत्री ना. अब्दुल सत्तार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते ग्रामपंचायतीचा सन्मान करण्यात आला.

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन २०२०-२१ व सन २०२१-२२ अंतर्गत पुरस्कार विजेत्या ग्रामपंचायतींचा २४ एप्रिल रोजी स्वा. सावरकर नाट्यगृह येथे सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला कृषीमंत्री ना. अब्दुल सत्तार, पालकमंत्री ना. उदय सामंत, जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री कीर्तीकुमार पूजार, अतिमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. परिक्षित यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा. पं.) श्री. राहुल देसाई , तसेच गटविकास अधिकारी निवड श्रेणी वर्ग -१ पं. स रत्नागिरी श्री. जे. पी. जाधव आदी उपस्थित होते.

जिल्हा परिषद गट स्पर्धेमध्ये जि. पं. शिरगाव गट अंतर्गत बसणी ग्रामपंचायतीला प्रथम क्रमांक प्राप्त झाला. ना. उदयजी सामंत, कृषीमंत्री महाराष्ट्र राज्य मा. श्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते हा विशेष पुरस्कार ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी व अधिकारी यांना प्रदान करण्यात आला. यावेळी ग्रा. पं. बसणीच्या विद्यमान सरपंच सौ. साक्षी सुहास झगडे, ग्रामसेविका सौ. अनुराधा सुबोध सुर्वे व ग्रा. पं. सदस्य उपस्थित होते. हा विशेष पुरस्कार मिळणेसाठी तत्कालीन सरपंच श्री. अनिल काशिनाथ मयेकर विद्यमान सरपंच सौ. साक्षी सुहास झगडे, ग्रा. पं. सदस्य व ग्रामस्थ बंधुभगिनीचे सहकार्य लाभले.