जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक महाराष्ट्रात दुसर्‍या क्रमाकांवर

रत्नागिरी:- क्रिसील या संस्थेकडून महाराष्ट्र राज्य बँकेने तयार करून घेतलेल्या मॉड्युलनुसार गुणवत्ता निकषानुसार रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक महाराष्ट्रात दुसर्‍या क्रमाकांवर आहे. बँकेने आपल्या ग्राहकांना अद्यावत तंत्रज्ञानाने परिपूर्ण अशा सेवा दिल्या आहेत. दरवर्षी बँक सभासदांना चांगल्या प्रकारे लाभांश देत आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी दिली.

बँकेच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेवेळी उपाध्यक्ष बाबाजी जाधव, कार्यकारी संचालक अजय चव्हाण आणि संचालक उपस्थित होते. डॉ. चोरगे म्हणाले, बँकेच्या 23 शाखा स्वमालकीच्या जागेत आहेत. प्राथमिक शेती सहकारी संस्थांची कर्जव्यवहारात, ठेवीत तसेच कर्जवसुलीत समाधानकारक प्रगती करण्यासाठी आणि शेती सहकारी संस्थांचे खाजगी सचिवांना प्रोत्साहीत करण्यासाठी दरमहा 1,500 रुपये आर्थिक मदत दिली जाते. बँकेने सामाजिक उपक्रमाचा भाग म्हणून धर्मादाय निधी उभारला असून त्यातून शैक्षणिक उपक्रमांना, शासकीय सामाजिक उपक्रमांना त्याचप्रमाणे अत्यंत गरजू व आपदग्रस्त लोकांना आर्थिक मदत केली जाते. दरवर्षी बँकेमाफत शेतकरी मेळावे, बचतगट मेळावे, महिला सबलीकरण प्रशिक्षण कार्यक्रम घेतले जातात. शेतकरी, व्यापारी, ग्राहक व अन्य नागरिकांना बँकींग सेवा पुरविण्यासाठी 3 मोबाईल एटीएम व्हॅन कार्यरत आहेत. कोव्हीड प्रादुर्भावामुळे बँकेच्या 2 मयत कर्मचार्‍यांच्या तसेच संस्थेच्या एका सचिवाचे वारसांना आर्थिक मदत करण्यात आली.

बँकेकडील सेव्हींग्ज् खात्यात वेतन जमा होणार्‍या जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय कार्यालये, कंपन्या, अनुदानीत व विना अनुदानीत शाळा, महाविद्यालयातील 3409 पगारदार खातेदारांना 2021-22 मध्ये विमा संरक्षण दिले असून, अपघाती निधन झालेल्या 3 विमाधारकांना 90 लाख विमा नुकसान भरपाई प्राप्त झाली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून बँकेला मोबाईल बँकींग लायसन्स प्राप्त झाले असून, मोबाईल बँकींग अ‍ॅप सुरू करण्यात आली आहे. आपदग्रस्त शेतकर्‍यांकरीता आर्थिक सहाय्य देण्यात आले आहे. बँकेला आतापर्यंत सीबीएस प्रोग्रॅम पुरस्कार, राज्य सहकारी बँक असोसिएशनचा तंत्रज्ञान प्रसार पुरस्कार, उत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी पुरस्कार, उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार, महाराष्ट्र शासनाकडून सहकारनिष्ठ पुरस्कार, बँकिंग फाँटियर्स पुरस्कार, बँको पुरस्कार 2016-17, बँकिंग फाँटियर्सचा बेस्ट चेअरमन व बेस्ट क्रेडिट ग्रोथ पुरस्कार, शासनाचा सहकार भूषण पुरस्कार, बँकिंग फाँटियर्सचा बेस्ट प्रोडक्ट इनोव्हेशन पुरस्कार, बँको ब्ला रिबन सहकारी बँकी पुरस्कार, बँकिंग फाँटियर्सचा बेस्ट इन्व्हेस्टमेंट पुरस्कार, बँको ब्लु रिबनचा सहकारी बँक पुरस्कार, फाँटियर्स इन को-ऑप. बँक अ‍ॅवॉर्ड, फाँटियर्स इन को-ऑप. बँक वॉर्ड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

कर्ज वसुलीत संचालकांचा पाठपुरावा

बँकेच्या संचालकांनीही सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे 225 कोटी रुपये कर्ज वसुलीवरुन कोटीपर्यंत आली आहे. यामध्ये कर्मचारी, अधिकार्‍यांनीही चांगले काम केले, असे डॉ. चोरगे यांनी सांगितले. यावेळी वसुलीसाठी प्रथमच डिजीटल तंत्राचा वापर करण्यात आला होता. तो यशस्वी झाला असल्याचेही त्यांनी सांगितले.