राजापूरात दुचाकी अपघातात वृद्धाचा मृत्यू; एक गंभीर जखमी

राजापूर:- राजापूर तालुक्यातील मिठगवाणे-जांभळवाडी येथे झालेल्या दुचाकी अपघातामध्ये अरूण सहदेव पवार (70, रा. मिठगवाणे, जांभळवाडी) यांचा मृत्यू झाला. या अपघातात दुचाकीवरील अन्य एकजण गंभीर जखमी झाला आहे. शुक्रवारी सकाळी 10.30 वाजता हा अपघात घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरूण पवार व त्यांच्याच वाडीतील शिवराम बर्गे हे दोघे दुचाकीने मिठगवाणे येथून भाजीपाला घेवून घरी जात होते. यावेळी वाडीतील तीव्र उतारावरून दुचाकी चालवत असताना गाडीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी विश्वनाथ काशीनाथ बर्गे यांच्या घरासमोरील गडग्याला आदळली. या अपघातामध्ये दुचाकी चालवणारे अरूण पवार ठार झाले, तर शिवराम बगै यांना गंभीर दुखापत झाली.