चिपळूणात तिहेरी अपघातात दुचाकीस्वार जखमी

चिपळूण:- मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कापसाळ – मोरेवाडी येथे तिहेरी अपघात घडला. रविवारी दुपारी बोलेरो गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बोलेरोने कारसह दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर झाला आहे.

सागर उमासरे (दळवटणे) असे जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. सागर हा दुचाकीस्वार कापसाळ परिसरातील मोरेवाडी येथे रस्ता ओलांडत होता. त्याचवेळेस समोरून आलेल्या बोलेरो गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटले व त्याने दुचाकीसह एका कारला धडक दिली. यात बोलेरो उलटून सागर हा गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच कापसाळ परिसरातील नागरिक घटनास्थळी दाखल झाले. जखमी दुचाकीस्वाराला उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले.