शिक्षकांना पाहिजेती शाळा; मुख्यमंत्र्यांच्या घोषणेला हरताळ

चुकीच्या नियमामुळे पन्नाशी पुढील शिक्षक अतिदुर्गम भागात

रत्नागिरी:- शिक्षक म्हणून नोकरी लागल्यापासून ते वयाच्या पन्नाशीच्या पुढे येईपर्यंत अनेक ठिकाणी जाऊन विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम केले. जेव्हा तरुण व कुटुंबाची जबाबदारी नव्हती तेव्हा ज्या ठिकाणी बदली झाली तेथे काम केले. मात्र, सध्या पन्नाशी ओलांडल्यावरदेखील अतिदुर्गम भागात बदल्या होत आहेत. त्यामुळे पन्नाशी ओलांडलेल्या शिक्षक दाम्पत्यांना आता शासनाच्या या बदलीच्या धोरणाचा फटका बसणार आहे. परिणामी, अनेक शिक्षक व शिक्षिका संतप्त भावना व्यक्त करीत आहेत.

बदली प्रक्रीया राबवत असतांना,परिपत्रकामध्ये वेळोवेळी मांडण्यात आलेल्या सूचनेनुसार योग्य तो बदल करण्यात आला आहे. मग अवघड शाळेतील रिक्त पदस्थापना करण्याच्या या टप्प्यामध्ये अनेक त्रुटी असून त्या वारंवार निदर्शनास आणून देखील त्यावर विचार केला गेला नाही. यादीत जिल्ह्यातील 159 प्राथमिक शिक्षक हे सेवाज्येष्ठ शिक्षक बदलीपात्र नसतानाही त्यांना सेवाज्येष्ठते नुसार या अन्यायकारक बदल्यांना सामोरे जावे लागत आहे.तसेच बदली टप्प्यातील बदली पात्र शिक्षकांची संभाव्य यादी उशिरा प्रकाशित करण्यात आली. टप्पा क्र. 4 च्या वेळी प्रकाशित केली असती तर शिक्षकांनी एक युनिट पती पत्नी एकत्रीकरण या पर्यायांची निवड केली असती.
परिपत्रकाप्रमाणे जर दुर्गम शाळा भरणे अनिवार्य असेल तर संवर्ग चार या संवर्गातून दुर्गम शाळा भरण्याचा आग्रह करणे आवश्यक होते, या टप्प्यामध्ये सर्व ज्येष्ठशिक्षक 51 ते 53 या वयोगटातील आहेत काही शिक्षक हे आता 50 पूर्ण असलेले देखील आहेत परंतु दि. 28 फेब्रुवारी 2023 च्या शुद्धीपत्रकाप्रमाणे संवर्गसाठी दिलेल्या सवलतीमध्ये 53 पूर्ण साठी दि. 30 जून 20 22 ही तारीख दिल्यामुळे शिक्षक या सवलतीपासून वंचित राहले आहेत. जर बदली प्रक्रिया 2023 ला पूर्ण होत आहे तर यासाठी देण्यात आलेली तारीख ही त्याप्रमाणे दिली असती तर या शिक्षकांना या संधीचा लाभ घेता आला असता त्याचप्रमाणे दुर्धर आजाराने ग्रस्त नुकतेच दुर्गम क्षेत्रात काम करून आलेले अशा शिक्षकांचा समावेश झ्ााला आहे.
तसेच या टप्प्यामध्ये बदलीने पदस्थापना देण्यात आलेल्या या शाळा महिला शिक्षकाच्या दृष्टीने अत्यंत गैरसोयीच्या असून अशा ठिकाणी या टप्प्यातील शिक्षिकांना येणाऱ्या अडचणीना या वयात रोज सामोरे जावे लागणार आहे. या टप्प्यामध्ये मधील बदली झ्ाालेल्या शिक्षकांपैकी काही शिक्षकांच्या दोन वेळा बदल्या झ्ााल्या आहेत म्हणजे सदर शिक्षकांची आंतरजिल्हा बदली झ्ाालेली असताना त्या शिक्षकाना जिल्हांतर्गत बदल्यामध्ये समाविष्ट करून पुन्हा बदली केली गेली आहे. यामुळे बदली यादीतील अग्रक्रमास बाधा निर्माण झ्ााली सदर शिक्षक या बदल्यातून वगळण्यात यायला हवे होते यामुळे नक्कीच त्यांच्याशी संबंधित असलेल्या दोन्ही शाळांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे.

टप्प्यामध्ये बदलीने जाणारे बहुतांश शिक्षक हे जास्त पटाच्या शाळेतून कमी पटाच्या शाळेत जात आहेत. त्यामुळे त्यांच्या सध्याच्या शाळेचे शैक्षणिक नुकसान होणार असून,तसेच एक शिक्षकी शाळेतील शिक्षकांची या टप्प्यात बदली झाल्याने संबधीत शाळा शून्यशिक्षकी होणार आहेत.त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांचे देखील शैक्षणिक नुकसान होणार आहे.

या महिनाअखेर पर्यंत शासन राज्यभरात सुमारे तीस हजार शिक्षकांची नव्याने भरती करणार असल्याचे, मग नव्याने सेवेत दाखल होणाऱ्या शिक्षकांची अशा शाळांमध्ये नेमणूक केली तर त्या शाळेतील मुलांचेही भले हाईल, ना ज्येष्ठ शिक्षकांना त्रास. मग कशाला हा अट्टाहास? कोकणची भौगोलिक परिस्थिती वेगळी, नव्याने भरती होणार आहे, त्यांची नियुक्ती या ठिकाणी करता येईल;पण वयोवृध्द शिक्षकांना जणू शिक्षा म्हणून या वयात दुर्गम क्षेत्रात जाणेसाठीच हा बदली टप्पा निर्माण केला की काय अशी ओरड होतांना दिसत आहे.