गुहागर:- गुहागर तालुक्यात खालची शीर येथे आबलोली रस्त्यालगतच्या झालेल्या दुचाकीच्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला तर अन्य एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
चिपळूण तालुक्यातील दादर येथील श्री रामवरदायीनीची यात्रा आटपून हे दोघेही तरुण गुहागर तवसाळकडे निघाले होते यावेळी हा दुर्देवी अपघात झाला. चिपळूण तालुक्यातील कादवड येथील शैलेश सुनील जाधव याचा अपघातात दुर्दैवीरीत्या मृत्यू झाला आहे. तर रोहित दीपक कदम हा तरुण गंभीरित्या जखमी झाला आहे.
गुहागर तालुक्यातील अबलोली भातगाव मार्गावर शीर गावाजवळ हा दुर्दैवी अपघात झाला. ग्रामस्थांच्या सहकार्याने पोलिसांनी या अपघातातील दोघांना तातडीने आबलोली प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारांसाठी दाखल केले. यावेळी दोघांपैकी एका तरुणाचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषीत केले. बेशद्ध असलेल्या दुसऱ्या तरुण उपचारा दरम्यान शुद्धीवर आल्यावर मृताची ओळख पटविण्यात यश आले व या अपघात प्रकरणाचा उलगडा झाला. चिपळूण तालुक्यातील कादवड गावातील शैलेश सुनील जाधव (वय २०) आणि रोहित दीपक निकम (१९) हे दोन तरुण शुक्रवारी पहाटे ४ वाजता दुचाकीने (एमएच ०८ यू २३५६ ) गुहागर तवसाळकडे निघाल असताना हा अपघात झाला. तवसाळला आंबा काढणीचे कामासाठी चालले होते. सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास चिपळूण वरुन गुहागर तवसाळ येथे जात असताना शीर येथे आल्यावर हा भयंकर अपघात झाला खालची शीर येते आबलोली रस्त्यावर एक तीव्र वळण आहे.
या वळणात भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीस्वारासमोर काजूच्या झाडाची फांदी आडवी आल्याने हा भीषण अपघात झाला. दोघेही रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतात शिरले. तेथे काजूच्या झाडाची एक फांदी आडवी आली होती. हे दोघेही या फांदीवर आदळून बेशुध्द पडले. अपघातानंतर जवळपास अर्धातास हे दोन्हीही तरुण बेशुध्दावस्थेत पडले होते. शुक्रवारी सकाळी ६.३० च्या सुमारास ग्रामस्थांनी हा अपघात पाहून पोलीस ठाण्यात खबर दिली. अपघाताची माहिती मिळताच तातडीने गुहागरचे पोलिस घटनास्थळी पोचले. पोलिसांनी शैलेश आणि रोहितला बेशुद्धावस्थेतच गुहागर आबलोली आरोग्य केंद्रात तातडीने दाखल करण्यात आले. आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांनी शैलेश सुनील जाधव याला मृत घोषित केले. तसेच रोहित निकमवर उपचार सुरु केले. शुध्दीवर आल्यानंतर त्याने अपघाताबाबतची हकीगत पोलसांना सांगितली. या नंतर या घटनेतील मृत शैलेश जाधव याच्या नातेवाईकांना कळविण्यात आले.मृतदेहाच्या उत्तरीय तपासणीनानंतर शैलेशचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. अपघातग्रस दोघांच्याही डोके फांदीवर आदळून गंभीर दुखापत झाली आहे. शुक्रवारी दुपारनंतर रोहित निकम याला अधिक उपचारांसाठी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे. या संपूर्ण घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पवन कांबळे करत आहेत.
दरम्यान या दुर्दैवी अपघातात शैलेश सुनील जाधव या मृत्युमुखी पडलेल्या तरुणाच्या पश्चात आई-वडील लहान भाऊ व बहीण असा परिवार आहे. हे सगळे कुटुंब आंबा बागेच्या देखभालीकरता गुहागर येथे असते शैलेश आंबा काढणीची कामे वगैरे मोलमजुरीची कामं करून आपल्या कुटुंबांच्या उदरनिर्वाहासाठी हातभार लावत होता त्याच्या अशा दुर्दैवी अपघातातील निधनामुळे गुहागर व चिपळूण कादवड परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.