आरटीई अंतर्गत प्रवेशपात्र विद्यार्थांना कागदपत्र पडताळणीसाठी डेडलाईन

रत्नागिरी:- रत्नागिरी जिह्यातील आरटीई अंतर्गत पात्र 92 शाळांमध्ये प्रवेश क्षमता 929 असून 1106 अर्ज प्राप्त झाले आहेत. ज्या बालकांची निवड यादीमध्ये प्रवेशासाठी निवड झाली आहे. त्या बालकांच्या पालकांनी 13 एप्रिल 2023 ते 25 एप्रिल 2023 या कालावधीत पंचायत समिती स्तरावरील पडताळणी समितीकडे जाऊन कागदपत्रे तपासून घेऊन आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा असे आवाहन जि.प.पाथमिक शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.

बालकाचा मोफत व सक्तिच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 अन्वये दरवर्षी प्रमाणे 25 टक्के प्रवेश प्रक्रिया पूर्ण राज्यामध्ये ध्हत्ग्हा पध्दतीने राबविली जाते. त्यानुसार सन 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई 25 टक्के प्रवेशासाठी सोडत ( लॉटरी ) बुधवार, 5 एप्रिल 2023 रोजी राज्यस्तरावरून काढण्यात आली आहे. तसेच रत्नागिरी जिह्यातील आरटीई अंतर्गत पात्र 92 शाळांमध्ये प्रवेश क्षमता 929 असून 1106 अर्ज प्राप्त झाले आहेत. संचालक शिक्षण यांचे 5 मार्च रोजीचे पत्रानुसार 12 एप्रिल 2023 रोजी दु . 3.00 वाजले नंतर ज्या बालकांची लॉटरीद्वारे 25 टक्के प्रवेशासाठी निवड झाली आहे, त्या बालकांच्या पालकांना त्यांनी अर्जामध्ये नमूद केलेल्या मोबाईल नंबरवर एसएमएस पाठविले जातील.

ज्या बालकांची निवड यादीमध्ये प्रवेशासाठी निवड झाली आहे. त्या बालकांच्या पालकांनी 13 एप्रिल 2023 ते 25 एप्रिल 2023 या कालावधीत पंचायत समिती स्तरावरील पडताळणी समितीकडे जाऊन कागदपत्रे तापासून घेऊन आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा. पडताळणी समितीने प्रवेश निश्चित केल्यानंतर पालकांनी 30 एप्रिल 2023 पर्यंत शाळेमध्ये जाऊन बालकांचा प्रवेश घ्यावा. 25 टक्के प्रवेश प्रक्रिया पारदर्शक पध्दतीने नियमानुसार राबविली जात आहे. प्रवेश प्रक्रिये अंतर्गत प्रवेश क्षमते एवढ्या विद्यार्थ्यांची लॉटरीद्वारे निवड होणार आहे. सबब पालकांनी 25 टक्के प्रवेश प्रक्रियेबाबत कोणताही दलाल / संस्था यांच्या प्रलोभनांना बळी पडू नये असे आवाहन पाथमिक शिक्षणाधिकारी वामन जगदाळे यांनी केले आहे.