जिल्ह्यात कोरोनाचे नव्याने नऊ रुग्ण; एकूण १८ रुग्ण उपचाराखाली

रत्नागिरी:- जिल्ह्यात मागील २४ तासात ९ कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. यामुळे उपचाराखाली असलेल्या एकूण रुग्णांची संख्या १८ इतकी झाली असून यातील ८ रुग्ण गृह विलिगीकरणात तर १० रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.

नव्याने सापडलेल्या ९ रुग्णांपैकी खेड येथील , गुहागर १, चिपळूण १, रत्नागिरी ४, लांजा १ आणि राजापूर तालुक्यात एक रुग्ण सापडला आहे. सद्यस्थितीत एकूण दाखल रुग्ण १८ असून यापैकी गृहविलगीकरण ८ तर रुग्णालय दाखल रुग्ण १० आहेत. बुधवारी १५ रुग्ण बरे झालेले आहेत.