खेडमध्ये दुचाकी अपघातात जखमी दुसऱ्या विद्यार्थ्याचाही मृत्यू

खेड:- मंडणगड तालुक्यातील दुधेरे येथे खेड-पुरार या राज्यमार्गावरील पुलालगत 26 मार्च रोजी दुचाकी अपघात होवून गंभीररित्या जखमी झालेल्या सिद्धांत अरविंद माने (18, भरणे-खेड) या विद्यार्थ्याचाही गुरूवारी पनवेल येथे उपारादरम्यान मृत्यू झाला.

या अपघातात सिद्धांत माने व पार्थ विजय इंदुलकर (मूळ चिपळूण, सध्या रा. भडगाव) हे दोघे दुचाकीवरून प्रवास करत असताना त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. या भीषण अपघातात पार्थ इंदुलकर या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला तर सिद्धांत माने हा गंभीररित्या जखमी झाला होता. प्रकृती चिंताजनक बनल्याने सिद्धांतला अधिक उपारासाठी पनवेल येथील एम.जी.एन. या शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याची प्रकृती खालावल्याने त्यातच त्याचा मृत्यू झाला.