रत्नागिरी शहरातील तरूणाचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी:- शहरातील आंबेडकरवाडी येथील तरूणाचा अशक्तपणामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. महेश (मुकेश) प्रभाकर कांबळे (३५, रा. आंबेडकरवाडी रत्नागिरी) असे मृताचे नाव आहे. या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

पोलिसांनी महेश हा मागील काही दिवसांपासून अशक्तपणामुळे आजारी होता. त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. उपचारादरम्यान २७ मार्च रोजी सकाळी ७ च्या सुमारास महेश याचा मृत्यू झाला.