कमोडीटी मार्केटमध्ये नफा मिळवून देण्याच्या आमिषाने लाखोंची फसवणूक, तिघांवर गुन्हा

खेड:- तालुक्यातील लोटे येथे एका वृध्दाला कमोडिटी मार्केटमध्ये नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आली ही घटना 7 जानेवारी ते 18 फेब्रुवारी 2023 दरम्यान घडली.

याबाबतची फिर्याद थिच्चूर पद्मनाभन किश्नन (57, नोकरी, घरडा कॉलनी, एमआयडीसी, खेड) यांनी खेड पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल पांडे (पूर्ण नाव माहित नाही), तारा (पूर्ण नाव माहित नाही), प्रणव शर्मा (पूर्ण नाव माहित नाही) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. कमोडिटी मार्केटमध्ये जास्त नफा मिळवून देतो असे सांगत वारंवार तीन वेगवेगळ्या अकाऊंटवर पैसे टाकायला सांगून पैसे उकळले. मात्र आपली फसगत झाल्याचे लक्षात येताच थिच्चूर किश्नन यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.