चिपळूणात दोन वाहनांनी घेतला अचानक पेट

चिपळूण:- तालुक्यातील ओमळी- गोंधळेवाडी येथे एक रिक्षा व बोलेरो पिकअप अशा दोन वाहनांनी पेट घेतल्याने गोंधळ उडाला. ही घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. अचानक लागलेल्या या आगीत लाखो रूपयांचे नुकसान झाले.

सविस्तर वृत्त असे की रिक्षा व बोलेरो पिकअप ही दोन्ही वाहने नवीन असून गुरुवारी रात्री ती एका ठिकाणी गाडी मालकांनी उभी करुन ठेवली होती. मात्र मध्यरात्री अचानक ही वाहने पेटून मोठे नुकसान झाले. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.